ओढ

काळ्या सावल्यांना
सापडेना डोह
गवाक्षातून चंद्र
डोकावतो जुनाच

तरूच्या देहावर
भयाट हवा
अदय हास्य
बुंध्याशी होते

आकाश वाकले
जरासे काही
धरेच्या गर्भी
कुठले तारे?

अनंतास सा-या
शांत झोप लागे
येरझा-या माझ्या
सदा अनंत

काळ सरोनी
सरो काळरात
नभास माझ्या
ओढ सूर्याची