आदरणीय खोडसाळ यांची एक खोडी... केवळ खोडी...
खो. ड. सा. ळ
खोड्या तुझ्या अशाही खोड्या तुझ्या तशाही
हासून हाल झाले हसण्यास अंत नाही
डोके तरी कसे रे वेगात धाव घेते?
डोळे सदाच शोधी काव्यात "व्यर्थ" काही!
"काळा"स "बाळ"केला "जगण्यास" "जेवणे" रे
केले "विश्व","अश्व" तू, कोणास खंत नाही..
देवा! कुठून आली वाचा अशी छचोरी?
देवा! नदी अता ही ,माझ्या मनात वाही..
तू खोडसाळ असला, आले तुझेच वारे
केल्या तुझ्याच खोड्या तर का चुकतं काही?
विनवी तुला असे मी समजून खेळ सारा
मैत्रीण मानुनी तू खोडीस फक्त पाही
(व्यक्तिगत रोख व/वा संदर्भ वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)