अनिरुद्धरावांना मानाचा मुजरा..
त्यांचा ठिपका पाहून कारकुनाचा विटलेला डगला नवीन होण्याचे स्वप्न पाहू लागला...आणि
(ठिपका)
घडायचे ते घडले काही टळले नाही
कळून सारे डाग टाळणे चुकले नाही
कळले नाही कधी तो साबण संपला..
हे नुसते धोपटणे परी संपले नाही
आज अचानक घाट तोच हा समोर आला
जुना आठवून मार ... कपडे रडले नाही...
तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण माझ्या शर्टा ते काही जमले नाही...
तशी जुनी कपड्यांची माझी ओळख आहे
पण ठिगळांना का त्या मी ओळखले नाही?
मान्य कधीही केले नाही आपण विटलो
रंग बांधणीमधील पण हे चढले नाही
बदलत गेला धोबीघाट नि बघत राहिलो
धोब्यास बदलणे मज कधीच जमले नाही.....
तो गेल्यावर नजर तुझी माघारी वळली..
खिशात त्याच्या पण पाकिट तर उरले नाही?
पाहिले मी तुला जळून ठिपका होताना
(राखेतून येशील; पंख मोडले नाही... )
पाहिले जरी तुज वाजत गाजत जातांना...
कविता करणे , कवीस कुटणे सुटले नाही...
-