पावसाळा

बरसण्याची आस खोटी लावतो हा पावसाळा
माणसांचा जीव आता टांगतो हा पावसाळा

पीक ही वाळून जाते काहिलीने या उन्हाच्या
नेहमी डोळ्यात पाणी आणतो हा पावसाळा

हे बळी जाती बिचारे लोक सारे पावसाच्या
का नको त्या त्या ठिकाणी नांदतो हा पावसाळा

लाख झाल्या वेदना अन लाख केल्या प्रार्थना ही
या बळीचे दुःख कोठे जाणतो हा पावसाळा

संपण्याची वेळ येते शेवटी जेव्हा ऋतूची
अमृताचे थेंब तेव्हा टाकतो हा पावसाळा

                           --स्नेहदर्शन