मोठ्या बाजारातील अनुभव

सध्या मॉल्स चा जमाना आहे. सर्व लोक मोठमोठ्या मॉल्स मध्ये जाउन खरेदी करतात. मी पण तेच करते. पण मला अशाच एके ठिकाणी आलेला अनुभव इथे नमूद करावासा वाटतो जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही. आपण अशा मॉल्स मधून ऑफर्स बघून खरेदी सुद्धा बरीच करतो. एकदा मी आणि माझा नवरा अशाच एका मोठ्या बाजारात गेलो होतो. तिथे आम्ही हव्या त्या वस्तू घेतल्या आणि मग बिलिंग काउंटर ला थांबलो. अशा ठिकाणी  बिल बघितल्यावर एकदा मला शंका आली की आपल्याला इतके जास्त्ती बिल कसे आले? म्हणून बिल नीट तपासून  बघितल्यावर माझ्या लक्शात आले की काही वस्तुंच्या बाबतित लिहीले होते तितके डिस्काउंट दिले गेले नव्हते. पण बिलिंग च्या रान्गेत इतकी गर्दी होती की मी हे बिल बाहेर येउन बघितले होते. मग  पुन्हा आत जाउन संबन्धित व्यक्तिंच्या निदर्शनास आणून देणे आणि मग ते पैसे घेउन येणे ह्यात बराच वेळ गेला. मनस्ताप ही बराच झाला. असाच अनुभव त्याच ठिकाणी पुन्हा  २/३ दा आला. कधी घेतलेल्या वस्तुचे डिस्काउंट न मिळणे तर कधी घेतलेली वस्तू ६० ग्राम ची असताना ८० ग्राम चे वजन आणि चुकिची किम्मत बिल वर छापून येणे. तर सर्व ग्राहकान्ना माझी अशी विनंती आहे की बिल चेक करून घेणे. आमच्यासारखी फसवणूक व मनस्ताप इतर लोकान्ना होवू नये ह्यासाठी हा लेखनप्रपंच.