अशी ही अमेरिका
नाहीप्रेम नाही जिव्हाळा नाही आस्था बर कां !
म्हणून म्हणतो "नको ती अमेरिका" (ध्रु)
उंच उंच इमारती टुमदार बंगले आहेत
त्यांच्या भोवती हिरवेगार सुंदर बगीचे आहेत
परंतु मनासारखा शेजार नाहीबर कां! (ध्रु) १
मित्र मैत्रिणी आहे पण त्या दूरच राहतात
हाय` हाय म्हणून दूरूनच हात करतात
त्यामध्ये स्नेहाचा झरा नाही बर कां !(ध्रु) २
एकटेच तुम्हाला फिरावं लागत
सोबतीला तुमच्या कोणी नसत
विरंगुळा तुम्हा कुठलाच नाही बर कां! (ध्रु)३
समृद्धी आहे पैसा आहे
जगामध्ये नांव लौकिक आहे
पण समाधान नाही बर कां! (ध्रु)४
येथे आईवडिल मुले सगळीच वेगळी राहतात
वर्षातून एकदाच मुले आइवडिलांना भेटतात
येथे दिसत नाहीत नातीगोती बर का! (ध्रु) ५
दुरून डोंगर साजरे ही म्हण मला पटली
अमेरिकेला येवून माझी हौस मात्र फिटली
यापेक्षा "आपुली मातृभूमिच" श्रेष्ठ बर कां ! (ध्रु) ६
- अनंत खोंडे