मी बोचले म्हणालो

मी बोचले म्हणालो, ती कोणत्या ठिकाणी?
मी हे तुला कसे पण सांगू मिठीत राणी

ठरवून काल लुटले मॉलात बायकोने
आधी तिला कशाला न्यावे अशा ठिकाणी!

 गुंगीत राहतो मी सुस्तीत वागणारा 
 असते सदैव पिउनी स्वारी घरी उताणी!

 असतो खुशीत तेव्हा  घेतो  मजेत झुरके
 जातो हवेत तेव्हा होते बधीर वाणी 

होणार काय ह्याचे आहे जगास पत्ता
(हा ढोसतोय दारू समजून रोज पाणी )

 खोड्या अशा कवींच्या का काढतोस "केश्या"?
 लिहिती कधी तरी हे  असली सुरेल गाणी

- केशवसुमार

(सुवर्णमयींच्या 'मी बोचलो म्हणाले  ' या गझलेवर आधारित)