दिसायची

दिसायची , हसायची, दूर दरवळायची,  

ऊन अंतरातले ,दे मला म्हणायची ध्रु 

पाहताना पाहणे लपवायचे,

 ती जिथे जाईल ,तेथे जायचे,

तिच्या घराकडे अचूक ,पावले वळायची.१

पाहता तिला ,मनात ,मोगरा फुलायचा,

 जीवही ,सुगंधसा, हवेवरी झुलायचा

नाकळे ,कशामुळे  ,पापणी भिजायची.२

एकदा तरी तिला ,बोलूया मनातले,

ठरविले हजारदा ,परी न ओठ बोलले,

आरशातही  अशी ,तीच रुमझुमायची.३

हे असेच, आजवर ,घडत ऱाहिलॅ सदा

ती न ,भेटली पुन्हा, राहिली उरी व्यथा

विरंगुळा मनास हाच ,ती स्म्रुती जपायची४