भाव-जीवन

भावना उनाड  बेछूट धुंद
अंतरात विझते  जीवन मंद

झालो आता  ठार कोरडा
होतो पापणीतला  आषाढ वेडा

शब्दात माझ्या  सलाचे वजन
वेडा म्हणोनी  हासती सृजन

शोधीत फिरतो  शब्दांचा अर्थ
गदारोळ उठतो  भावनांचा व्यर्थ

यातनांचा ओघ  वाहतो चिरंतन
स्पंदनात जळतो  अंधार सनातन