कैक मतले ..फक्त पडलेले!
काफिये..का सर्व अडलेले?!
रोज गगनाची मला पृच्छा.,
"काय तव पंखात दडलेले..?!"
सूर्य संध्येला असा भासे..,
की क्षितीजी रत्न जडलेले!
बांध तोरण जर्द पानांचे..,
रे वसंता...बहर झडलेले!
घुंगरू आले नशीबी अन,
पाय मग हे खूप रडलेले!
का अजूनी शिखर गवसेना..?
पाय तर वेगात पडलेले..?!
सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!
-मानस६