खेद-खंतीच्या पल्याडा
निस्संग मी कोरडा !
कधी वादळाचे
ज्वाळांचे कधी कधी
बीज ज्यात सामावले...
पोटी ते भरले जरी
बेधुंदीच्या पल्याडा
निस्संग मी कोरडा!
क्षीर असो धवल वा
नीर निर्मल असो
ओज ज्यात सामावले...
पोटी ते भरले जरी
क्रुशता-बाळशाच्या पल्याडा
निस्संग मी कोरडा!
मज हाताळती जे ते
हात राठ की कोवळे
भावना बोकाळल्या वा
हळुवार तरंगणाऱ्या
पाप-पुण्याच्या पल्याडा
निस्संग मी कोरडा!
पालथा असो वा उपडा
निस्संग मी बापुडा
आकाशाचा मी प्रतिनिधी
'प्याला' म्हणतात मजला!!!