दलदल......

मी नसायची कारणे सदा काढतात सारे
मी असायचे फायदे जरी लाटतात सारे

जे मुळात नाही तिथे अशी लाथ मारली मी
की नको तिथे लागल्यापरी नाचतात सारे

काळ लोटला, थांबले कधीचे, वयाप्रमाणे!
चोरुनी फुगे लावुनी युवा भासतात सारे

तो तसाच वाटे म्हणावयाला तयार सारे
तो कसा असे सांगताच मी लाजतात सारे

नाव नासले काव्य चोरले हार घाल त्यांना
या जगात त्यांना महाकवी मानतात सारे