हास फक्त एकदाच
मौन तोड एकदाच
दृष्टीच्या घे कवेत--
---- ये कवेत एकदाच!
ध्यास नसे नात्याचा
मोह नसे पाशाचा
एकच क्षण गुंतावे---
-------क्षण एकच----एकदाच
नको नको क्षण तुटके
क्षण अगणित नको रिते
आवरून धरलेला
तोल सोड एकदाच!
चिंब चिंब एकदाच
क्षण तुडुंब एकदाच
तू मला नि मीच तुला
सावरू दे एकदाच!
--मुग्धा रिसबूड
रचनाकाल : जानेवारी, १९९५.