आपली, आपली म्हणताना, माणसे दुरावत गेली..
आली आली म्हणताना, सांज ढळत गेली....
बघता- बघता मातीची नाळ तुटत गेली..
घट्ट धरलेल्या हातातून, बोटे सुटत गेली....
न कळलेली, नात्यांची कोडी सुटत गेली..
वरवरची, चमकदार बेगड उडत गेली....
तुझी वाट पाहता- पाहता, पापणी शिणत गेली..
सारा अंधार दाटताना, आशाही मावळत गेली....