खोल खोल डोळ्यांच्या डोहात
दु:खाच तळ साठत होत
एक लहर ही नव्हती त्यात
फ़क्त अंधाराच जाळ वाढत होत
वाटत होते कोठुन तरी
एक वार्याची धुंद झुळुक यावी
डोळ्यात साठलेल्या पाण्याची
एक लाट तरी ओसंडावी
बांध तुटावा या डोळ्यावरचा
अन वहावे पणी ढळाढळा
मनाची तगमग थांबवण्यास
ग्रिष्मात सुद्धा दाटुन यावा पावसाळा
पण माझे मन तरी
कोठे याला मनते
डोळ्यात साठलेल्या आसवांवरच
प्रेम करुन बसले
ठरवले आहे आता
विसरुन सार्या जगाला
याच तळ्याच्या काठावर
बसुन रहावे आयुष्यभर