नकाशे

जे नकाशे योजनांचे आखले
शेवटी गझलेत सारे छापले

हा पसारा पाहिला की वाटते
काय आहे चाललेले आपले!

सांगते निष्पाप बाळाचे हसे
लोपले सारे जुने अपुल्यातले

भव्य तारा शोधला कोणी नवा
भान थोडे क्षुद्रतेचे वाढले

आर्जवे शब्दांमधे गुंफून मी
या जगावर राग माझे काढले