दु:खांची ना उठली पाले..
------------------------------------------------
गंगा आली इतके झाले.
मुक्तीसाठी जमले नाले..
काम तसे सरकारी होते.
लाच घेऊनी सारे आले..
आयुष्याला युद्ध म्हणालो.
टोचुनि गेले मजला भाले..
चला करुया चर्चा म्हणता.
प्याल्यामागुनी भरले प्याले..
परस्परांना सभ्य समजलो.
मी ही भ्यालो ते ही भ्याले..
किती भटकतो? थांब! म्हणालो.
दु:खाची ना उठली पाले..
-------- योगेश जोशी (बंगळुरू)