जीवन दिले, मृत्यू दिला, अगतिक बनवले
हेही पचवले शेवटी तेही पचवले
"नाही तुझे अस्तित्व आता" काळ बोले
ते वृत्त नवलाचे मला मीही कळवले
ती हासली, काही जणू झालेच नाही
मीही क्षणासाठी मला नाही द्रववले
ती माणसे प्यारी कुठे आहेत आता?
हे कोणते युग या जगामध्ये उगवले?
ती बालपणची कात का गेली मनाची?
हे काय झाले, काय मी होते ठरवले?
संख्या कमी झाली अता फुलपाखरांची
मध संपला की बोलती "याने दुखवले"