माझ्या ह्या कवितेला देवकी पंडितांचा स्वरसाज लाभलाय "सारे तुझ्यात आहे" ह्या अल्बम मधलं हे गाणं ह्या लिंक वर ऐकता येईल.
दुवा क्र. १
तुझा हळवा पाऊस
आज आठवतो मला
चिंब सरीनं तयाच्या आज
भिजवतो मला
कधी बरसणं तुझं
रिमझिम अलवार
नखशिखांत भिजते
त्यात मी रे हळुवार
कधी तुफानी कोसळ
गरजत बरसत
कधी झिम्माड झिम्माड
द्वाड प्रीत फुलवत
आता कधी रे येशील
मनी सारखा सवाल
घन दाटता नभात
पुकारते वेडी प्रीत
तुझ्याविना हा पाऊस
आसू आणतो डोळ्यात
धरा कोरडी कोरडी
परी डोळे वाहतात
जयश्री अंबासकर
जुनीच कविता आहे.... पण देवकी पंडितांच्या आवाजात ऐकवतेय