वसू का अंतरी मी?
अता नाही जरी मी
किती आरोप झाले...
कवी नाही तरी मी
तुझे खोटे निघाले
"तुझे खोटे, खरी मी"
असा मुरवून आहे
तुझ्या काही सरी मी
अबोला काव्य होतो
रुसे माझ्यावरी मी
किती श्रीमंत झाले
दिसे ज्यांच्या घरी मी
बऱ्या-वाईट मधली
किती मोठी दरी 'मी'
मला आवाज नाही
जगाची बासरी मी
तुझे आयुष्य आहे...
किती घालू भरी मी?
हवा आहे कुणाला?
उगाचच भरजरी मी