शब्दान्चे नजराणे वाहीले
तुझ्याच चरणी शारदे
शक्ती दे मती दे बुद्धी दे
रन्गविण्या या शब्दाना
भाव ह्रुदयी उचम्बळू दे
जन्मभराचे कवित्व घेउन
आम्ही शब्दान्पुढे नमतो
तुझ्याच आशिर्वादाने माते
अक्षरान्चे इमले रचितो
प्रत्येक लेखणीवरून तुझा
हात वात्सल्याचा फिरू दे
रन्गविण्या या शब्दाना
भाव ह्रुदयी उचम्बळू दे
तुझ्याच कृपेने निघती
सप्तसूर ह्या ह्रुदय स्पन्दनी
हे तुझेच वीणावादन आई
करी मुग्ध सुर झन्कारूनी
प्रतिभेला या आमुच्या देवी
पाठबळ तुझे सदैव राहू दे
रन्गविण्या या शब्दाना
भाव ह्रुदयी उचम्बळू दे
सुप्रिया