वाटे तुडुंबसे, जग हे एकएकटे
जे काल हासले, रडले एकएकटे
नक्कीच आपले 'भुरटे' प्रेम बोचले
गर्दीत जाहले मन हे एकएकटे
हेही बघून घ्या, बघता काय जोडपी
बागेत केवढे बसले एकएकटे
माझ्यापुढे तरी नुसती जीभ घोळवे
ती काय माहिती... करते एकएकटे
लोकांस वाटताच तुझे जन्मणे इथे
लोकांस वाटता जळणे एकएकटे
हे चालणे तुझे, दुनिया पाहते अशी
सारेच जणू यार तुझे... एकएकटे
सूर्यासभोवती जमली मालिका पुरी
तारे नभात खूप तसे... एकएकटे