सप्तशृंग शक्तिपीठ

दर्शन  घेऊनी  मातेचे, जातो  पुढील तीर्थास
वणी डोंगरावर, सप्तशृंगीमाता  स्थान  खास
उंच  पाहता  दिसती, सात  शिखरे डोंगरास
म्हणुनी  असते मातेस  नाव, सप्तशृंगी खास

घोर तपस्या करे मार्कंडेय,  देवीस करे प्रसन्न
आदेशाने देवीच्या, करे मुनी  तिला स्थानापन्न
दर्शनास या जागृतस्थानी, भक्त येतात प्रच्छन्न
दर्शन घेऊनी पावन होती,करती जीवन संपन्न

मोठे कुंकू विशाल भाली, सुंदर दिसे हे मातेचे
नथ नाकात सुंदर,तेजस्वी सौंदर्य  ते  नयनाचे
शिरपेची मुकुट चांदीचा, पारणे फेडे डोळ्याचे
विलोभनीय रुप मातेचे, ठसते  ह्रदयी  सदाचे

प्रसाद मातेचा भक्षण करती असीम भक्तिभावाने
यात्रा पूर्ण करती पीठाची, सप्तशृंगीच्या दर्शनाने
विलोलित होती भक्त, विविध देवीच्या स्वरुपाने
सांगता करे यात्रेची, जय मातादी मंगल जपाने