पानिपत...

जे न घडायचे तेच घडले पुन्हा,

पुढे टाकलेले पाऊल अडले पुन्हा...

अपुला कोण? कोण परका म्हणावा?

कित्येक असे प्रश्न, आज पडले पुन्हा...

पाठीत घुसे, तो खंजीर ओळखीचा,

रक्तच रक्ताशी भिडले पुन्हा...

कोण जिंकले- हरले, काय पुसता?

आपलेच आपसात लढले पुन्हा...

भाऊबंदकी असे शाप ज्या भूमीला,

तिथे 'पानिपत' आज घडले पुन्हा...