खेळ

खेळ

ही भाषा कसली अशब्द संवादाची
कसली ही तृष्णा मौनहि वाचायाची

वाटतो शब्द पण लांच्छन, वाजे डंका 
ऐकुनी शब्द मग भलत्या घेती शंका
नुसतेच ध्वनी ते --काय चूक शब्दांची?
सांडते वल्गना तटबंदी बंधांची

हा कशास सारा खुळा खेळ शब्दांचा?
अपराधी होउन हालाहल गिळण्याचा?

---मग बरा आपुला अभाव या शब्दांचा
अन् मौन वाचणे ----- बरा खेळ तृष्णेचा! 
---------------
रचनाकाल : ११ नोव्हेंबर २००९