तुझ्याविना जगणे धुसर

इथे चांदणे टपोर, खिडकीच्या काचेवर

ही पावसाची रेघ, जणू काचेवरचा तडा,

भिजल्या पावसात, तुझ्या आठवांचा सडा,

धुवांधार पावसात, धुंद पावसाची सर

त्या पलीकडे, एक प्रतिमा धूसर,

तुझी प्रतिमा धूसर

इथे......

जगू कशी तुझ्याविना, हे जगणे असार,

तुझ्याविना जगण्यास, उद्दिष्टच थोडेफार,

जगणे तुझ्यासवे होते सुंदर सुंदर,

आत आहे जगणेच तुझ्याविना धूसर,

तरी जगायचे आहे,

थोडेफार थोडेफार...