जेथे जातो तेथे ....

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
मानगुटीवरी बसोनीया

मीच तुझा बाप मीच तुझी माय
ओझे तुझे वाही निरंतर

जरा दूर जाता मीच ओढून घेई
दुर्बुद्धी ऐसी का होतसे

तुका म्हणे दुःख सुखाहूनी लाडके
म्हणोनी ना सोडवे क्षणभरी