चला वाट जाते तिथे जाउया

चला वाट जाते तिथे जाउया
कुणालातरी आपले वाटुया

कुणाला विकावा अहंकार हा?
समुद्रास पाणी कसे खपवुया?

तुडवले तरी ही जगवते मला
जमीनीस माथ्यावरी लावुया

कमळ येत राहील चिखलातुनी
कमळ जाउदे पण चिखल होउया

निरोपानिरोपी पुरे जाहली
स्मशानामधे लाकडे लावुया