गझल

सगळ्याच कळ्या फुलतात कुठे,

फुलतातही ज्या जगतात कुठे?

मी सापडलो नाहीच तुला,

तु शोधियले हृदयांत कुठे?...

गेले वादळ शिकवून मला,

काठावरचे बुडतात कुठे?...

केल्यात फुलांनी जखमा ह्या,

काटे आता सलतात कुठे? ...

पाऊस असा बेभान तरी,

सारे वणवे विझतात कुठे? ...