शोध

(ही गझल मी मनोगतावर लिहिलेली पहिली गझल - जुलै २००५ मध्ये . आता तिच्या चालीसकट देत आहे.)

शोधीत चाललो मी माझेच नाव आहे
नाही अनोळखी हा माझाच गाव आहे

कित्येक थांबले अन् हासून बोललेही
सलगीत साधला हा त्यांनीच डाव आहे

पाहून गाव गेले ते पाहुणे म्हणाले
'रुंदावण्यास येथे क्षितिजास वाव आहे'

स्वप्ने नकोत आता बेधुंद सागराची
होडीस कागदाच्या कोठे टिकाव आहे

सांगू कसे मनाला नाहीच वाट येथे
स्वप्नात गुंतण्याचा त्याचा स्वभाव आहे!

वाटेत खाच खळगे असतील! जाणतो मी...
ही वाट चालण्याचा माझा सराव आहे

संकेत मीलनाचे घेऊन रात्र आली...
(बेकार वावड्यांना भरपूर वाव आहे!)

जा, घे 'कुमार' हाती तू हात दुश्मनाचा
भेटावयास तोही घेतोच धाव आहे...

चाल:
ताल - दादरा, आधारभूत राग - मुख्यतः किरवाणी
टीप - मंद्र सप्तकातले स्वर तिरप्या अक्षरांमध्ये आणि हिरव्या रंगात लिहिले आहेत (खाली टिंब कसं द्यायचं हे माहिती नसल्यामुळे). तार सप्तकातल्या स्वरांवर अनुस्वार आहे.

१ २ ३ । ४ ५ ६ । १ २ ३। ४ ५ ६ । १ २ ३ । ४ ५ ६ । १ २ ३ । ४ ५ ६ । १ २ ३ । ४ ५ ६ ।
-  -  -  । -  -  शो । धी S त| चाS  S ल।लो S S | मी S मा। झेS S च। नाS S व। आ S S।हे S ना ।
-  -  -  । -  -   प  ।  प  -   | पम    । प   -   -| प   -   प । प नि ध । पम ग रे । म - - ।म -  रे ।
ही  S अS।नोS S ळ। खी S हा|S  S मा ।झा S च | गाs sss व। आ S S।हे S
  -  रेसा।सारे म  रे । सा नी नीध प प ।    -  म |पध पमग रे । सा - - ।सा-

१ २ ३ । ४ ५ ६ । १ २ ३। ४ ५ ६ । १ २ ३ । ४ ५ ६ । १ २ ३ । ४ ५ ६ । १ २ ३ । ४ ५ ६ ।
-  -  -  । -  -  कि । त्ये S क| थां S ब ।ले  S S | अन् S हा। सू S न ।बोS SS ल।ले S S।ही S सल ।
-  -  -  । -  -   रे  ।  रे  -  रे | नी ध  प ।    -   -|     -   म । म   - म । निध धनि ध। प - -  ।प - नीनी ।
गी  S त ।सा S  ध । ला S S|हाS S त्यां।नीS  S च| डाS S व। आ S S ।हे  S 
सां  -  - ।सां  -   रें । नि  -  - |धप म  म ।धनि सां नि|प   म ग। प   -  - । प - 

१ २ ३ । ४ ५ ६ । १ २ ३। ४ ५ ६ । १ २ ३ । ४ ५ ६ । १ २ ३ । ४ ५ ६ । १ २ ३ । ४ ५ ६ ।
-  -  -  । -  -  सां । गू S क | से S  म  ।ना  S S  |लाS S ना।हीS S च।वाS S ट। ये S थे । S S स्व ।
-  -  -  । -  -   नी ।सां  - सां| सां - रें । नि   -   -| धप   म   म। धनि सां नि। प म ग । प  -  प  । -  -  प  ।
प्ना  S तS।गुं S त  ।ण्या S S|चाS S त्या।चाS  S स्व|भाS SS व। आ S S ।हे  S 
  -  पम ।म    रे। रे   -  - |रेसा नि नि ।रेम  -   म| निध धनि ध। प - -  ।प -

'पाहून गाव.. ' हा शेर 'कित्येक थांबले..' प्रमाणे तर बाकीचे शेर 'सांगू कसे' प्रमाणे.

- कुमार जावडेकर

ता. क. स्वररचना (नोटेशन) लिहिण्याची सोपी पद्धत (रकाने आखणे, अक्षराखाली टिंब देणे इ.) मनोगतावर उपलब्ध आहे का?