माझा सुखान्त

कधी निवांत क्षणी, दाटून येतं मनं,
काही गोड तर काही आठवणी कडवट.
ठसठसत राहतात खोलवर काही जखमा,
सलत राहते कुठलीशी एकलकोंडी व्यथा.
उरात कैद काही हळव्या प्रीतीचे हळवे क्षण,
आणि तुझं मला आपलं माणनारं मनं.
कधी कधी पेटतात काही ज्वलंत प्रश्न,
काही विझतात, काही पुसतात.. कशासाठी हे जगणं?
निद्रिस्त दुख: त्यांची, बोजड आठवणी काही,
जोडलेली नाती काही अन तुटलेले सोबती काही.
कधी तुझ्या हसर्‍या क्षणांची खट्याळ बात,
मी कोसळताना.. तू खंबीर.. पुन्हा नवी सुरवात.
मी अशीच शोध घेते माझ्या वळून आत,
निर्विकार मनाच्या तळाशी भेटतो माझा सुखान्त.
कधी निवांत क्षणी, दाटून येतं मनं...