आलो कुठून? अन् कुठे असेल जायचे?
हे नाकळे कुणासही, कसे कळायचे?
बंदिस्त सर्व ही जमीन या नभामुळे,
येथून किती दूर अता मी पळायचे?
आहे प्रचंड शांत डोह या मनामधें,
त्याचे नशीब, फक्त आत खळखळायचे ।
आलो कुठे इथे सुखे जगावयास मी?
माझ्याच जीवनास या मला छळायचे ।
सोसून सर्व, हास्य जे असेल या मुखी,
मृत्यो, तुझ्या मिठीतही न विरघळायचे ।
- चैतन्य.