मागू लागले ..

आरसे भल तेचमागू लागले,
आमुचे चेहरेच मागू लागले!

बोललो इतकेच मी, "का मारता? "
ढाल छळणारेच मागू लागले!

ना कुणी काट्यांस वाली राहीला,
फुल देव्हारेच मागू लागले!

!मागणाऱ्याना जरा सौजन्य नाही,
दान प्राणांचेच मागू लागले!

काल जे गेले दिलासे देऊनी
मोल त्यांचे तेच मागू लागले!

जे कधी जगलेच नाही मोकळे,
प्रेमही हलकेच मागू लागले!

काय मी झोळी धरू त्याच्यापुढे?
भीकही सगळेच मागू लागले!