ह्यासोबत
एक दिवस दत्ता जोशी वकिलांच्या वडिलांच्या श्राद्धाला जेवत होता. सदाभटजी श्राद्ध चालवायला होते. श्राद्धाचे विधी चालू होते. वर्ष श्राद्ध होतं . दत्तानी त्यांना पाहिलं होतं. त्यांचा आवाजही ऐकला होता. सदाभटजी त्याला सारखे विचारीत होते. नानांची परवानगी घेतलीस कां? श्राद्धाला जेवायला बसतोयस . कोणी समोर नाही असे पाहून त्याला म्हणाले, 'श्राद्धाला नानांच्या मुलाने जेवणे मला पटत नाही, आणि वर्षश्राद्धाला तर मुळीच नाही. पण तुझा आग्रह होता म्हणून तुला बरोबर घेतला. बघ , अजून विचार कर. केवळ अकरा रुपयांसाठी तू जेवणार कां?
पाहिजे तर मी अकरा रुपये देतो आणि विष्णू वैद्याला जेबायला बसवतो. त्याला नाहीतरी कशाचाही विधिनिषेध नाही. तरीही दत्ता ठांम होता. तो काहीच बोलला नाही . तो जेवायला बसला व दुसरे दोघे मंत्र म्हणू लागले. इतक्यात त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. बघू या जोशांच्या वडिलांचा आवाज काढून.
मग त्यानी जेवता जेवता यशवंतरावांचा आवाज काढून जोशांना म्हंटलं, 'अरे गोविंदा, बघतोस काय नुसता. काकडीच्या कोशिबिरित तिखट जाळ मिरची आणून घाल. ' आणि आश्चर्य म्हणजे, वाढणाऱ्या जोशी काकू दचकल्या, म्हणाल्या, 'मामंजी माफ करा, पण आज मिरची मिळालीच नाही. आणते कुठून तरी'. डोळे मोठे करीत तो मोठ्याने म्हणाला, गोविंदा, परसात्ल्या नाग्वेलीच्या पानांचा विडा तरी कर माझ्यासाठी. '. त्यानी दोन्ही गोष्टी अशाच ठोकून दिल्या होत्या. पण त्या बरोबर निघाल्या. आणि गोविंदरावानी नमस्कार करून म्हंटले, 'आत्ताच तयार करतो बघा. ' सगळेच आवाक होऊन पाहात राहीले. दिवाणखान्यात शांतता पसरली . सदाभटजी थरथरू लागले. म्हणाले, "दत्ता , अरे भानावर ये. दत्ता, दत्ता , आता नाही बाबा तुला असा जेवायला बसवणार.. " थोड्यावेळाने दत्ताने संचार आवरता घेतला. चुपचाप जेवला. जाताना अकरारुपये कसले, जोशांनी एक कोट टोपी आणि नवीन धोतरही दिलं व पुन्हा पुन्हा पाया पडून क्षमा मागितली. झालं . घटनेचा बभ्रा झाला. गावभर सदाभटजी सांगत सुटले. मग काय जेवण्याची बोलावण्यावर बोलावणी येऊ लागली. लोकांना श्राद्धाला जेवायला दत्ताच लागू लागला. तोही तोंडाला येईल ती दक्षिणा मागू लागला̮ लोक देऊ लागले आणि कुजबुजू लागले, "नानांच्या मुलात पैशाचिक शक्ती आहे. "खबर नानांपर्यंत जायला वेळ लागला नाही.
एकदा मी रजा घेऊन गावी आलो . गावातल्या किराणा दुकानदाराकडे हे सर्व समजलं. पण दत्ता काही भेटला नाही. त्याच्या घरी गेलो तर नाना आणि त्यांचा ग्रुप गप्पा मारीत बसलेला दिसला. मला पाहून नाना म्हणाले, 'काय म्हणते मुंबई? आता इथेच राहणार आहेस का जाणार आहेस? मी पुढे होऊन त्यांच्या पायावर डोके ठेवले. नंतर नाना म्हणाले, 'लग्नाचा विचार असेल तर सांग बरं. म्हणजे स्थळंपाहायला हरकत नाही. मी मला सध्या लग्न न करण्याचे सांगितले. पण दत्ता बद्दल मुद्दामच विचारले नाही. नानाच म्हणाले, 'त्याला भेटायला आलायस वाटत ? मग तर तुला रात्रीच यावे लागेल.. आजकाल आपल्या भटजी लोकांची डोकी बिघडल्येत. काय समजलास. मी काय समजायच ते समजलो . घरी गेलो. दत्ता भेटला नाही याचे वाईट वाटलं. मी परत जाण्यासाठी बसस्टोप वर आलो . बस लागायला उशीर होता. एक्टाच बसलो होतो. तेवढ्यात एका माणसामागे लोकांचा घोळका लागलेला दिसला. बघतो तर काय , दत्ता पुढे आणि लोक त्याच्यामागे दगड घेउन धावतायत. दत्ताने असं काय केलं, की लोक मारायला उठावेत. मी घाईघाईने तसाच उठलो . जाऊन लोकांना अडवले आणि दत्ताला म्हणालो, 'माझ आजचं जाणं मी रद्द करतोय. मला येऊन भेट. (क्रमशः)