दत्ताराम.. भाग ४

 रात्री नवाच्या सुमाराला कडी वाजली . दार उघडून दत्ताला आत घेतले. तो नुसताच बसून राहिला‍ जरा वेळ तो काहीच बोलला नाही. मग तोच म्हणाला, 'तुला आजच्या प्रकाराबद्दल सांगतो. अरे, मला चांगली भिक्षुकी येत नाही , पाठ केलेले आठवत नाही , तर मी काय करणार रे ? ' त्याला पुढे बोलवेना, त्याचे डोळे भरून आले. मग म्हणाला, 'तुला दातारांचा मनीष माहीत असेलच (मी मान हलवली)मुंबईला कुठे नोकरीला असतो. अधून मधून येतो आणि इतका भाव खातो की बस. आमचे नानांना तर निमित्तच मिळत तुलना करायला. मला नाही रे काही जमत . मला पण मिळेल कां एखादी नोकरी, मुंबईसारख्या ठिकाणी ? त्याने माझ्याकडे अपेक्षेने पाहिले. मला आता गावात नाही राहायचे. बदल झाला तर सुधारेल की सगळ. " 'अरे , पण तू आजच्या प्रकाराबद्दल बोल ना. मी म्हंटले.

' आजचा प्रकार जरा वाईटच होता. तू कोणालाही सांगू नकोस. म्रुतात्मा शरिरात शिरतो वगैरे सर्व खोटं आहे रे. ते मीच निर्माण केलय. माझी कीर्ती ऐकून मला सदा पाटलाकडेही जेवायला बोलावलं होतं. पण तिथेही रावसाहेबांच्या घरच्याप्रमाणे संचार झाला नाही. म्हणून तर पाटलाची माणसं दगड घेऊन माझ्या मागे लागली. रावसाहेबांच्या घरी पण असाच प्रसंग आला. त्या दिवशी मला रावसाहेबांच्या वाड्यावर श्राद्ध होतं म्हणून जेवायला बोलावलं होतं. पण त्या दिवशी नेमके कोणीही भटजी नव्हते. रावसाहेबांच्या थोरल्या बंधूंची तीथ होती. अर्थातच माझी कीर्ती त्यांच्या घरापर्यंत पोचली होती‍ . जेवायचा बेतही चांगला होता‌. सुकामेवा घातलेली तांदुळाची खीर फारच छान होती. मला जेवायला वेगळे पान होते. रावसाहेब समोरच सिंहासनवजा खुर्चीवर बसले होते. घरातले माझ्या पंक्तीला कोणीच नव्हते. मला जरा विचित्र वाटले. पण रावसाहेबांपुढे बोलणार कसा ? तुला तर माहीतच आहे , मी तुझ्या वडिलांपुढे सुद्धा बोललो नाही.

मी जेवायला सुरुवात केली . रावसाहेब वगैरे सार्वच अपेक्षेने बधत होते. मला कसतरीच वाटलं. जणूकाही एखादा एकपात्री शो असतो तसे. बराच वेळ मी जेवत राहीलो. तेव्हा रावसाहेबांची बायलो म्हणाली, "हे काय गुरुजी आज अगदी तोंड बंद ठेवू न जेवताय ? आप्पा भावजी तुमच्या अंगात कसे आले नाहीत? कमाल आहे , ऐकलेलं सगळ खोटं की काय ? ". मला ऐन वेळेवर उत्तर सुचले.

"काकू , अहो मंत्रोच्चार झाल्याशिवाय संचार होत नाही. बारावा असेल तर या गोष्टी लगेच होतात. ".. हो, का ? काकू जरा उपरोधिक पणे म्हणाल्या‌ " सबंध गाव काय नेहेमी बारावे तेरावे करतो की काय ?, का नानांनी दम दिलाय तुम्हाला. " . मी म्हाटले "तसं नाही काकू. ".

"मग कसं रे शिंच्या ? रावसाहेब एकदम कडाडले, " का आमचं जेवण कमी प्रतीचं वाटतय ? अरे त्यांना आणखीन वाढा, बोलवा सुनबाईंना वाढून पाहू त्यांच्या हातून. "

आणि रंजना वहिनी वाढायला आल्या. पाचसहा वर्ष लग्नाला झाली होती . पण अजून अपत्य योग नव्हता. राव साहेबांना कोणीतरी सल्ला दिला होता की पितरांना त्रुप्त करा. म्हणजे संतती प्राप्ती होईल. म्हणून रावसाहेबांनी मला जेवायला बोलावले होते. पण श्राद्ध अथवा पक्ष केला नव्हता. माझी कीर्ती माहित असल्यामुळे असेल किंवा नानांचा मुलगा म्हणून असेल. रंजना वहिनी पुढे झाल्या. भाताची खीर वाढू लागल्या. मी खीर सोडून वहिनींच्या नाजुक हातांकडे आणि ब्लाउजमधील घळीकडे पाहिले. मग त्यांनी नाजुक आवाजात म्हंटले. "गुरुजी खिरीची वाटी तरी रिकामी करा. म्हणजे आण्खीन खीर वाढता येईल. ". माझे पोट खरं तर भरत आलेलं होतं. तरीही मी ती वाटी रिकामी करून वहिनींच्या आग्रहाखातर म्हणण्यापेक्षा त्यांच्या जवळू न दिसणाऱ्या सौंदर्याखातर पुन्हा खीर घेतली. त्यांच गोड हासणं , नाजुरितीने हातातली सोन्याची कांकण वाजवणं, यांत मी इतका अडकून गेलो , की मलाजेवायला बोलावलय , हे विसरलोच. रावसाहेबांच्या तीक्ष्ण नजरेने हे टिपलं असावं. त्यांच्या तोंडावर नापसंतीची एक सूक्ष्म छटा येऊन गेली असावी असे मला वाटले. अर्थातच रंजनावहिनी आत गेल्या असाव्यात.

थोड्या वेळाने मी जेवण आटोपून बाहेर आलो . विडा चघळीत बसलो होतो. रावसाहेब सोडून सर्वानी मला नमस्कार केला. घरातील महिलावर्गाला यथाशक्ति आशीर्वाद दिले. रंजनावहिनींनी मला नमस्कार केला तेव्हा मात्र त्यांच्या हाताची बोटं माझ्या पायाला लागली. आणि माझ्या सर्वांगातून विजेची लहर गेली. आतापर्यंत कोणत्याही स्त्री कडे मी अशा रितीने पाहिले नव्हते. आणि प्रथमच स्त्री आली ती नेमकी रंजनावहिनी होती. रावसाहेबांची एकूण मुद्रा पाहून मी पुढील सर्व आवरते घेतले व जागेवरून उठलो. नाहीतर माझा कार्यक्रम फार मोठा असायचा. मी चुपचाप निरोप घेलून जवळजवळ पळालोच. घरी येईपर्यंत मी मागे वळून पाहिलेही नाही.

चालता चालता मी विचार केला. आपली आणि रंजनावहिनींची काय बरोबरी. आपण एक कुप्रसिद्ध भिक्षुक(श्राद्ध पक्षाला जेवणारे) आणि ती एका संस्थानिकाची सून. आप्ल्याला ना कोणतीही उत्पन्नाची कला ना आपल्याजवळ इतर काही गूण . पण रंजनावहिनी मनात जरळत राहिल्या.नंतर चारपाच दिवस असेच गेले. वहिनींनी मला पूर्ण पछाडलेले होते. मध्ये एक्दोन श्राद्ध पक्षांची बोलावणी आली. मी शो बरोबर केला. पण माझ मन त्यात नव्हत. घरात रोज नाना वाटेल तसे बोलायचे. मला घरात राहावेसे वाटेना. दुसराउपायही नव्हता. एक दिवस वाड्यावरून एक नोकर आला. त्याने मला नावाने हाक मारली. मी विचारले , काय रे काय काम आहे ? ' माझ्या छातीत धस्स झाले. रावसाहेबांना माझाशी रात्री काय काम आहे . क्ळेना. मग तोच म्हणाला, "जी मी तुकाराम , वहिनीसाहेबांनी वाड्यावर बोलवलय, चला बिगी बिगि. ". आत नाना बरे नसल्याने झोपले होते. मला हल्ली घरात , मी कुठे जातो , केव्हा येतो, हे विचारीतच नसत. मी तुकारामच्या मागे लगबगीने निघालो. वाड्यात शिरताच वहिनी स्वागतासाठी समोर आल्या. मी दबकत दबकत खालच्या मानेने आत गेलो. न जाणो रावसाहेब कडाडायचे. वहिनी दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसल्या. त्यांच्या समोरच्या चौरंगावर मी बसलो." सध्या घरी कोणीही नाही. रावसाहेब उद्या सकाळी येतील. एरव्ही मला तुम्हाला बोलावण शक्य नाही. "असे म्हणून त्यांनी त्यांची पत्रिका आणि हात पुढे केला.

" गुरुजी मला सांगा , माझ्या हातावर आणि पत्रिकेत संतती योग नाहीच आहे का? " मी म्हणालो , ' वहिनी मला यातलं अगदी जुजबी ज्ञान आहे. तुम्ही नानांना दाखवा. ' हे काय गुरुजी तुम्ही एवढ्या मोठ्या विद्वान ब्राह्मणाचे पुत्र, तुम्हाला क्ळणार नाही असं होईल का ? निदान हात तरी बघा. ' असे म्हणून पुढे वाकून आपला डावा हात पुढे केला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी त्यांचा हात हातात घेऊन पाहावा की नाही या विचारात होतो. तेव्हा त्याच म्हणाल्या"अहो हात हातात घेऊन पाहिलात तरी चालेल. " मी हात हातात घेऊन पाहिला आणि मला जरा शॉक च बसला. मला फारसे काही कळत नसले तरी नानांकडून ओझरते काही हातांच्या रेषांबद्दल ऐकले होते. त्यावरून म्हंटले, "वहिनी , पुढील आठवडा अतिशय वाईट आहे. ". तशीही मला वेळ मारून न्यायची होतीचं . नाजुक हासून गोड आवाजात त्या म्हणाल्या, "अहो , असं काय अगदी विपरित घडणार आहे? सांगा , आता सगळ्याची सवय झाली आहे. हे इथे नसतातच . मामंजींचा स्वभाव तुम्हाला माहीत आहेच. मरण येणार का? फार बरं होईल. तसही आयुष्यात काय आहे आता. एवढ्या मोठ्या वाड्यात माझा जीव गुदमरतो. "

"म्हणजे नक्की काय होतं? मीविचारलं. "तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही म्हणा. या वाड्यातून बाहेर जाता येत नाही . घरातच राहण्याची सक्ती आहे माझ्यावर. मी आपलं गावही अजून पाहिलेलं नाही. रावसाहेब. सासुबाई आणि इतर चुगलखोर नोकर यांच्या भीतिने मला बाहेर जाण्याचं धाडसच होत नाही . आपलं माणूसच जर इथे नाही तर काय उपयोग ? " खिन्नपणे त्या म्हणाल्या.

"म्हणजे तुम्ही अजून व्यंकटेश्वर, मोहम्मद साहेबांचा दर्गा, तलाव , त्यालगतचं जंगल. तुमच्या वाड्याच्या मागूनच तर जाता येत. छोट्या रावसाहेबांनी तुम्हाला कधी बाहेर नेलच नाही का?

" नाही. ते येतात तेव्हा रावसाहेबांशी सारखे धंद्यातल्या व्यवहाराचेच बोलत बसतात. रात्र रात्र वाट पाहून निघून जाते. पण आपल्याला बायको आहे, तिलाही थोडा वेळ द्यायला हवा, असं त्यांना वाटत नाही. "

"मग तुम्ही त्यांना बोलला नाहीत का कधी " मी विचारले.

"बोलले की. पण ते एवढच म्हणायचे , की आपल्याला सबंध आयुष्य पडलय. धंदा चांगला पक्का झाला की तुला घेऊनच जाईन मी तिथे. " पण असं नुसतच बोलण व्हायच. त्यांच तर लग्न झालं तरी , आई वडीलांना विचारतात, म्हणून कौतुक होतं. पण माझ काय? खरं सांगते गुरुजी , तुम्ही घरी आलात आणि मी , लग्नानंतरच्या आयुष्यात प्रथमच एवढी बोलले. "

मीही जरा विचारमग्न झालो. वहिनींनी माझ्यावर चांगलीच जादू केली होती. मला तेथून हालावेसेच वाटेना. दिवाणखान्यातील घड्याळात नवाचे ठोके पडले. मी भानावर आलो . आपण निघावं हे बरं, असं मला सारखं वाटायला लागलं. पण पाय हालेनात . वहिनींकडे सारखे पाहातच राहावसं वाटत होतं. प्रत्यक्षात माझे डोळे जमिनीकडेच होते. चुकून रावसाहेब आले तर तर तर.....? असा विचार मनात येताच मानेवरून घामाचा थंड थेंब सरकत गेल्याची जाणीव झाली.. मी घाबरून तो विचार झटकून टाकला. वहिनींच्या प्रश्नानी माझी तंद्री भंग पावली. "गुरुजी दुधाचा पेला अजून तसाच आहे. फार बाई घाबरता तुम्ही. " मानेला एक लाडिक झटका देऊन तोंडावर आलेली केसांची बट मागे सारत वहिनी म्हणाल्या.

मी पेला रिकामा करीत म्हंटले, 'मला निघायला हवं. नाना ओरडतील. ' जणू काही नानांच्या ओरडण्याला भी क घालणार होतो. "ठीक आहे". त्या म्हणाल्या. मी उठणार , तोच खाली बग्गी थांबल्याचा आवाज आला. माझ्या अंगावरून सरसरून काटा गेला. पाठोपाठ दिंडी दरवाज्यातून रावसाहेबांचा खडा आवाज आला. "अरे, तुकाराम , घनश्याम उचला की सामान लवकर. रोज जेवताना रे. ताडताड चालत रावसाहेब समोर उभे ठाकले. मी वहिनींकडे पाहिले. त्यांची मुद्रा पांढरी फटक पडली होती. मला पाहून रावसाहेबांची मुद्रा कठोर झाली.

"तू ? तू तर ताबडतोब नीघ. नाहीतर चाबकानं फोडून काढीन. मी भिंतीच्या बाजूने दरवाज्याकडे सरकू लागलो. त्यांच्या हाताच्या टप्प्यातही असणं मला नको वाटू लागलं. न जाणो मुंडीच मुरगळायचे. हळूहळू दिवाणखान्याबाहेर पडलो. त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. "आणि काय ग सटवे , लाज नाही वाटत दुसऱ्या पुरुषाला घरात घेऊन गप्पा छाटायला. मी ऐकलं होतं, ते खरच होतं म्हणायचं. लग्नापूर्वी तुझे कुणाशीतरी संबंध होते म्हणे. आम्ही दुर्लक्ष करून तुला सून करून घेतली. पण तुझ्या वागण्यात काहीही बदल नाही. श्रीधरला काय वाटेल याचा विचार केलास ?

मी एवढे ऐकत दिंडी दरवाजा ओलांडला. आणि एकदाचा रस्त्यावर आलो̮ मागे वळूनही न पाहता मी घराकडे पळत सुटलो.

(क्रमशः)