पृथ्वीवर जन्नत आणन्यासाठी;
स्त्रीयांच्या गणिका करनारा तू;
हीरवा झेंडा हींदूस्थानात फडकवताना;
कदाचित जिंकलाही असतास तू.
पण त्या शहाजीचा वाघाचा छावा;
उभा राहीला सह्याद्रीच्या शिखरावर;
दोन्ही हातांनी घट्ट पकडल त्यानं;
तुझ्या विजयानं नासलेलं वारं.
तुला मिळालेलं अफाट ताकदीच वरदान;
संपत्तीचा चढलेला माज;
पण तुझ्यावरची शापांची लाखोली;
जीचं काहीच नव्हतं मोजमाप.
स्वतःला बापाला तुरुंगात टाकून;
तुरुंगाच्या फटीतून ताज दाखवलास;
हृदयातल्या यातना कवटाळून झूरताना;
त्याचा शापच तू आयूष्यभर भोगलास.
म्हणूनच बारा मावळ्यांच राज्य;
ज्याने तुझ्या अहंकाराची केली शकलं;
त्या मावळ्यांनी शिवबाच्या शब्दाखातर;
मराठी असल्याचं स्वत्व जपलं.
तू प्रयत्न केला स्वराज्य गिळण्याचा;
जरी नव्हता तुझा घास तेवढा;
पण त्या छोट्याशा शिवबानं;
अवघा सह्याद्रीच संधून ठेवला.
आजही जेव्हा दिसतो नराधम;
सत्तेसाठी धावताना, हपापताना;
तुझी आठवण हमखास येते;
अन् 'शिवबा पुन्हा जन्माला ये'
म्हणून महाराष्ट्राची माती आजही आक्रंदते.