काळ माजला! कवितेची खातो पानांवरती पाने!
माझी मस्ती! मी ही लिहितो दाबुन पानांवर पाने!
अशा कुवेळी जन्म घेतला! कसले काय न् कसले काय!
बोलत राहू आपुले आपण, कळले काय न कळले काय!
इतके कानी पडती नाद! सूर आतला? कुठला काय!
अशातूनही बसतो लिहिण्या, सुचले काय न सुचले काय!
असे वाटते जमणे नाही, "प्रचीतीजन्य" लिहावया!
असेच काही शोभिवंत मग लिहिले काय न लिहिले काय!
तुझ्याभोवती फिरल्या कविता! गरगर-भोवळ आली बघ...
तुला जरी मी प्रत्यक्ष कधी शिवले काय न शिवले काय!