ह्यासोबत
[एक अध:पतित, दुर्दैवी, नैराश्यग्रस्त आणि आत्मघाताकडे निघालेल्या युवकाला पूर्वसुकृतानुसार योग आल्यावर सद्गुरू भेटतात. दत्तकृपायोगाने त्याच्या वृत्तीमध्ये आणि आयुष्यात स्थित्यंतरे येतात. एक कहाणी अभंग स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न (क्रमश:) ]
स्वामी समर्थांचा| दृष्टांत जाहला|
कसा अकस्मात| स्वप्नामाजी||
नसे तुझा पुत्र| अनाथ दुर्दैवी|
स्वामीबळ पाठी| असे त्याच्या||
सद्गुरू तयाचे| भेटतील त्याला|
यावे तू सत्वर| दर्शनासी||
ऐसे कैसे घडे| म्हणे अघटीत|
आड येई तिचा| बुद्धिवाद||
स्वप्नी जे दिसले| सत्य त्या मानावे|
होई ना मनाचा| सुनिश्चय||
परी त्याच वेळी| सहाध्यायी एक|
सात्विक सज्जन| भेटी आले||
स्वामीपादुकांच्या| दर्शना चलावे|
आग्रह तयांचा| मोडवेना||
विकल पुत्रासी| घेई समवेत|
सत्वर निघाली| जननी ती||
स्वामीपादुकांचे| घडले दर्शन|
तैसेची पूजन| भक्तिभावे||
पुत्राच्या नयनीचे| दिसताच अश्रू|
माउलीचे डोळे| पाणावले||
पाहुनी पुत्राचा| दृढ भक्तीभाव|
येई जननीस| गहिवर||
म्हणे ती स्वामीस| अश्राप हा जीव|
शरण हो आला| दत्तप्रभू||
असे दीनवाणा| अथवा पतीत|
परी अहंमन्य| नसेची तो||
पदरात घ्यावा| उद्धार करावा|
सन्मार्गी लावावे| निजदासा||