कसे जाहलेले धुके हे हवेसे?
कसे वेड वाटे शहाण्यापरी?
अता वाटते तू नको सोबतीला,
अता वाटते तू नको दूर ही!
जिथे हात हातात मिसळून गेले
क्षणापास ये ना पुन्हा त्या अता!
ऋतू बघ परतला सवे घेऊनी ही
जशीच्या तशी ऊब अन् गंध हा!
मजा घेत आहे कधीचा उभा मी;
तुझ्या आठवांचे पिसारे खुले!
चेहरा सराईत! मनभर निळाई...
असे भान घेणे जमू लागले!
विझावेत भवतालचे सर्व दिवले;
नभातील वणवा दिसावा ’खरा’!
तसे एकदा मज तुला पाहू दे ना...
तशी एकदा तू ही झल्लोळ ना!!