छंद

बरेच अंतर चालून आलो

बरेच आहे चालायचे

इतके सगळे सांगूनही

थोडे आहे बोलायचे

कितीक थांबे विश्रांतीचे

वाटेमध्ये आले गेले

तहानलेल्या या जीवाला

किती जणांनी पाणी दिले

अनेक बंध नात्यांचे

पण एकच मजला बंध हवा

कळला नाही जडला केव्हा

अतृप्तीचा छंद नवा