अंगाई...

आनंदाच्या गं झाडाला,

नवी फुटली डहाळी,

तिच्यावर उमलली,

रूपकळी...

गोरुली, गोडुली,

मायास्नेहाने माखली,

नजरेच्या पाळण्यात,

विसावली...

बघता-बघता,

सई हसाया लागली,

गालावर उमटली,

गोड खळी...

इवलीशी झोळी,

फुलां-फुग्यांनी सजली,

तिच्यामध्ये विसावली,

सोनकळी...

किती, किती बोलवाल,

तिला छकुली,सोनुली,

नाव द्या ना छानदार,

शुभवेळी...

आता यावे गं आत्याने,

नाव कानात सांगावे,

शुभ आशीर्वच द्यावे,

पणजीने....

२६/५/१०