हिशेबाची माय मेली?

हिशेबाची माय मेली?
कशी झोपडी हीच अंधारलेली?
कुण्या उंदराने दिवावात नेली?
पुजारी पुसे एकमेकांस आता
नटी कोणती आज नावाजलेली?
तिला घाबरावे असे काय आहे
अशी काय ती तोफ़ लागून गेली?
किती नाडती आडदांडे तराजू
कशी रे हिशेबा, तुझी माय मेली?
कुणी हासला तो कळ्या कुस्करोनी
कशी दरवळावीत चंपा चमेली?
म्हणालेत आम्ही तुरुंगात डांबू
जरी तू कधी अभय फ़िर्याद केली..!
                                 गंगाधर मुटे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,