एकटे जगायचे..

एकटे जगायचे सुखाच्या शोधात,
मृगजळ सुखे सारी या आयुष्यात,
झोकून प्रेम द्यावे अढळ विश्वासात,
पोकळ हे जग सारे अश्रू करात,
एकटे जगायचे सुखाच्या शोधात...

मने जोडायची मैत्री अन नात्यांत,
दूर जाती सारे सोडून आपल्याच धुंदीत,
मग मरता मरता जगायचे प्रत्येक क्षणात,
म्हणूनच एकटे जगायचे सुखाच्या शोधात,

मग हाती काही न लागता सुन्न व्हावे याच एकटेपणात...