कशी जगतात ही माणसे ..?
कशी भीक मागून पोट भरतात ही माणसे
ही पोरे ..!
ह्या बायका ..!!
कोठे कशी झोपतात ही गरीब अर्धपोटी माणसे
कधी विचार केलाय का ह्यांचा ..?
तुम्ही झोपत असता एसीत
फिरणार्या पंख्याच्या खाली
मस्त स्वप्नाच्या घोटभर चवीत
निवांतपणे
निष्काळजीपणे सारे विसरून
नि ही झोपत असतात उघड्यावर
जेथे जशी जागा मिळेल तशी
कशीही .... !!
बांधकाम होत असलेल्या उंच इमारतीच्या स्ल्याबवर
उघडी वाघडी
आयुष्याला ढकलीत
संध्याकाळच्या भाकरीची फक्त चिंता
उद्याचा फक्त निव्वळ काळोख
अंगावर झेलीत...
कावळे चिमण्या कोठे कधी हरवून जातात
कधी बघितले आहे का ..?
तशीच ही माणसे कोठे हरवून जातात
कधी दिसले आहे का ..?
कशी जगतात नि कधी मरून जातात...?!!
बकरा कापला जातो तेव्हा त्याला कोठे ठाऊक असते
आपल्या गळ्यावर सुरी फिरणार आहे ...?
क्षणापूर्वी त्याची मस्ती चालू असते बक्रीबरोबर
तसेच असते का आपले आयुष्य
काळाची सुरी कधी फिरेल गळ्यावरून
खरोखरच आपण पण असतो अनभिद्न्य
त्या अजाण बक्र्यासारखे
शप्पत हे खूप खरे असते
मात्र ....
आपण पण किती असतो गुडूप अंधारात
हरवून गेलेलो
उद्याची स्वप्ने रंगवीत ...?
कुरवाळीत
आपण असतो जिवंत जगाच्या अंता ईतके [?]
किंवा चिरंजीव .
अश्वथाम्यासारखी
भळभळणारी जखम घेऊन ....
दुखाला कुरवाळीत ....!!