दुधारी

गंधास नाही आकार आधार
येते धुके कसे उकलून अंधार
तद्वत नि:शब्द भावना दुधारी
श्वासागणी घुमे निराकार ओम्कार

माझेच खेळ हे मनाच्या कुपी
मी; नरवानर चंचल अजूनही कपी
आकळे ना कळे; नाचवे बहुरुपी
धुंद माझ्यात मी जणू की मद्यपी

भास आभास सारेच अशी ही गती
सोसवे ना न सोडवे संभ्रमी स्थिती
राउळी आरती; कोण नाही तरी
लोक वेडा म्हणे; अखेर ही पावती

....................अज्ञात