गंधास नाही आकार आधार येते धुके कसे उकलून अंधार तद्वत नि:शब्द भावना दुधारी श्वासागणी घुमे निराकार ओम्कार
माझेच खेळ हे मनाच्या कुपी
मी; नरवानर चंचल अजूनही कपी
आकळे ना कळे; नाचवे बहुरुपी
धुंद माझ्यात मी जणू की मद्यपी
भास आभास सारेच अशी ही गती
सोसवे ना न सोडवे संभ्रमी स्थिती
राउळी आरती; कोण नाही तरी
लोक वेडा म्हणे; अखेर ही पावती
....................अज्ञात
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.