दुःख मी दुःखात हे मिसळून बघतो
हासुनी खोटे मला फसवून बघतो
आज ही हळवाच मी हे दुःख आहे
मी मला सुद्धा कधी दचकून बघतो
आरश्याला छेडण्याचा खेळ आहे
चेहऱ्याला जर कुणी बदलून बघतो
यातना माझ्या जवळ येते सदैव
मी तिला माझी सखी समजून बघतो
मज कुणी शोधू नये, बस! दूर ने तू
मी मला माझ्या जगी हरवून बघतो
---स्नेहदर्शन