अजून देहूतल्या दुकानी
........ विठूनामाचा गजर चालतो
इन्द्रायणिच्या डोहामधुनी
........ गाथेचा विश्वास जागतो
भामगिरीच्या शिखरावरती
........ वृक्षवल्लीही तशाच हलती
भावभारल्या हाका सरल्या
........ टपटप पाने अजून गळती
अजून इथल्या मातीमधुनी
......अबिराचा तो येतो परिमळ
पिंपुर्णीचे भाव अनावर
........ फाल्गुनातली तशीच सळसळ.....