कमी नाही

पावसाची इथे कमी नाही
पीक येईल पण हमी नाही

'उजडला बाग' केवढा मथळा
'फूल फुलणार' बातमी नाही

ती मतांची लढत कुणी जिंको
जिंकला आम आदमी नाही

एक सोडून ती महागाई
येथले काय मोसमी नाही?

लोकशाही कधी दिसे सांगा?
पाच वर्षात! नेहमी नाही

जीवना उघडतोस कां पडदा?
संपल्या अजुन तालमी नाही

----------------------------जयन्ता५२