साऱ्या मनांच्या राऊळी
अरे थेंबा तुझी आस
यावे देवा, होऊ तुझ्या
भोई पालखीचे खास
रुप किती ते आठवे
पार नयनी दाटले
किती पाहणार अंत
तळी झरे रे आटले
कशी भेगाळली धरा
उकलले प्राण प्राण
मुखी कोण घाली आता
जल नव्हे संजीवन
मेघराशीतून यावे
धारा सहस्त्र होऊन
तृप्त करुनी टाकावे
घ्यावे रुप तू सगुण
आर्त हाका घालताती
धरा माणसे तुलाच
ये रे देवा परजन्या
न्हाऊ घालावे तू तूच
अरे बरस बरस
घेई जीवनाचे रुप
ऐक गाऱ्हाणे साऱ्यांचे
सृष्टी होईल तद्रूप.....